Honda City चा हॅचबॅक मॉडल लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

कार उत्पादक कंपनी Honda City ने आपली लोकप्रिय सेदान कारचा हॅचबॅक व्हेरिएंट लॉन्च केला आहे. मागील 20 वर्षांपासून कंपनीच्या सर्वाधिक खरेदी केली जाणाऱ्या कारपैकी ही एक कार आहे. सध्या कंपनीने ही कार थायलंडमध्ये लॉन्च केली आहे. कंपनी लवकरच आपली नवीन हॅचबॅक हिंदुस्थानातही लॉन्च करणार आहे.

डिझाइन आणि व्हेरिएंट

कंपनीने नवीन हॅचबॅक S+, SV आणि RS व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. जी दिसायला सिटी सेदानसारखीच आहे. मात्र यात मोठा ग्रीनहाऊस एरिया, स्पोर्टी रीअर बम्पर आणि आठ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आला आहे.

इंजिन आणि फीचर्स

होंडा सिटी हॅचबॅकमध्ये स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इमरजेंसी अलार्म सिस्टम आणि स्टेबिलिटी असिस्ट याद्वारे सहा एअरबॅग असलेली सेफ्टी कंट्रोल सिस्टम आहे. यात 1.0-लीटर व्हीटीईसी टर्बोचार्ज्ड इंजिन दिले गेले आहे. जे 120 बीएचपी पॉवर आणि 173 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीव्हीटी पर्याय ही कंपनी देत आहे.

किंमत

या कारची किंमत 9.30 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम,) ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या