Husqvarna ने लॉन्च केली आपली इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये गाठणार 95 किमीचा पल्ला

स्वीडनची वाहन निर्माता कंपनी Husqvarna ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कंपनीने Viktorr असं या स्कूटर नाव ठेवलं आहे. कंपनीने सध्या ही इलेक्ट्रिक स्कूटर कॉन्सेप्ट म्हणून सादर केली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी E-Pilen कॉन्सेप्टवरूनही चर्चेत होती.

Husqvarna Viktorr ई-स्कूटर ड्युअल टोन इफेक्टसह आक्रमक दिसणाऱ्या बॉडी पॅनेलसह लॉन्च करण्यात आली आहे. याचा फ्रंट अ‍ॅप्रॉन ब्लॅक पेंटने सज्ज आहे. तसेच पॅनेलमध्ये हलकी राखाडी रंगाची शेड देखील देण्यात आली आहे. स्कूटर फ्रंटला एलईडी डीआरएलसह एक गोल आकार हेडलॅम्प देखील देण्यात आली आहे. ही स्कूटर शहरी भागातील गरजा लक्षात घेऊन तयार केली गेली आहे.

सध्या या स्कूटरच्या बॅटरी आणि किंमतबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती मिळू शकलेली नाही. या स्कूटरची टॉप स्पीड 45 किमी प्रतितास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 95 किमीचा पल्ला गाठू शकते, असा दावाही कंपनीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या