Hyundai i20 हिंदुस्थान लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Hyundai मोटर्स इंडियाने आपली बहुप्रतिक्षित कार i20 चा नवीन एडिशन हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केली आहे. बाजारात मारुती सुझुकी बालेनो, टाटा मोटर्स Altroz आणि टोयोटा Glanza या कारशी याची स्पर्धा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला या कारची किंमत आणि फीचर्स बद्दल माहिती सांगणार आहोत.

कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. आपल्याला ही कार बुक करायची असल्यास आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा डीलरशिपवरुन 21,000 रुपयांच्या टोकन रक्कमेसह बुक करू शकता. ग्राहक Hyundai क्लिक टू बाय बाय प्लॅटफॉर्मवरुनही i20 कार ऑनलाईन बुक करू शकतात.

पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय

Hyundai मोटर्सने चौथी जनरेशन i20 पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायासह लॉन्च केली आहे. याच्या 1.2 लिटर पेट्रोल इंजिनच्या मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 6.79 लाख ते 9.19 लाख रुपयांदरम्यान आहे. तर स्वयंचलित मॉडेलची किंमत 8.59 लाख ते 9.69 लाख रुपयांदरम्यान आहे.

डिझेल पर्यायामध्ये 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन

याच्या डिझेल व्हेरिएंट एक लिटर पेट्रोल इंजिन क्षमतेच्या मॉडेलची किंमत 8.79 लाख रुपयांपासून ते 11.17 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीने डिझेल पर्यायामध्ये 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन दिले आहे. याची किंमत 8.19 लाख ते 10.59 लाख रुपयांदरम्यान आहे.