Mahindra Thar 2020 हिंदुस्थानात लॉन्च; ‘हे’ आहेत नवीन फीचर्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्राने आपली लोकप्रिय Thar 2020 हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केली आहे. नवीन महिंद्रा Thar जुन्या व्हॅरिएंटच्या तुलनेत आकारात मोठी आहे. कंपनीने पहिल्यांदा 2010 मध्ये Thar हिंदुस्थानात लॉन्च केली होती. यानंतर कंपनीने 2020 मध्ये डिझाइन अपडेट करून Thar पुन्हा लॉन्च केली आहे.

पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायासह उपलब्ध

Mahindra Thar ला कंपनीने दोन इंजिन पर्याय, 2.0-लीटर mStallion TGDi पेट्रोल इंजिन आणि 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिनसह लॉन्च केले आहेत. यासह, या कारमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित ट्रांसमिशन आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.

रंग पर्याय आणि व्हॅरिएंट

नवीन मोहिंदर Thar सहा रंग पर्याय रेड रेज, मिस्टिक कॉपर, नेपोली ब्लॅक, एक्वामारिन, गॅलेक्सी ग्रे आणि रॉकऑन बेजमध्ये उपलब्ध असेल. तसेच, एक्स आणि एलएक्स या दोन व्हॅरिएंटमध्ये कंपनी ही कार 2 ऑक्टोबर 2020 रोजी हिंदुस्थानी बाजारात विक्रीसाठी बाजारात लॉन्च करणार आहे.