ओला-उबरमुळे वाहन विक्रीत घट, मारुती सुझुकीच्या संचालकांचे वक्तव्य 

695

ओला-उबर वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम वाहन क्षेत्रावर झाल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले होते. हिंदुस्थानात लोक आता EMI वर गाडी घेण्या ऐवजी ओला-उबर सारख्या वाहनांचा उपयोग करत आहेत, असे सीतारामन म्हणाल्या होत्या. मारुती सुझुकीचे संचालक आरसी भार्गव यांनी त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. मिंटच्या वृत्त अनुसार, भार्गव म्हणाले आहेत की, अर्थमंत्र्यांचे म्हणणे 100% बरोबर आहे. कारण हिंदुस्थानात लोक आता कार विकत घेण्या ऐवजी ओला-उबरच्या सेवेचा उपयोगकरून पैसे वाचवतात आणि या पैशाचा वापर आपल्या आवडीचे गॅजेट्स विकत घेण्यासाठी करतात, असे ते म्हणाले आहेत.

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार भार्गव म्हणाले आहे की, तरुणांना आपल्या मित्रांसोबत रेस्टोरन्टमध्ये जायला आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करायला आवडतं. अशातच त्यांना नवीन कार खरेदी करण्याऐवजी अशा गोष्टींवर पैसे खर्च करायला जास्त आवडतं. त्यातच तरुणाचा मासिक वेतनही इतकं नाही आहे की, ते घरापासून वेगेळे राहून आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकतील. त्यामुळे ते अधिकाधिक ओला-उबर सारख्या वाहनांचा उपयोग करतात. तसेच आजचे तरुण नवीन कार विकत घेण्यापेक्षा चालत फिरण्यास अधिक महत्त्व देतात.

असे असले तरी काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव हे अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर म्हणाले होते की, मागील सहा ते सात वर्षांपासून ओला-उबरसारख्या सेवा अस्तित्वात आल्या आहेत. याच कालावधीमध्ये वाहन क्षेत्राची भरभराट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. तर मग मागील काही महिन्यांमध्येच असं काय झालं आहे ज्यामुळे वाहनक्षेत्रात मंदी आली आहे? मला नाही वाटत की केवळ ओला-उबरमुळे वाहन क्षेत्रात मंदी आली आहे, असे ते म्हणाले होते. वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे एप्रिल ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान मारुती सुझुकी वाहनांच्या विक्रीत 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या