2.92 लाख किंमत असलेल्या Renault मिळत आहे मोठी सवलत! पहिले 3 ‘ईएमआय’ माफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Renault ने आपली सर्वात स्वस्त कार असलेल्या Renault Kwid कारच्या खरेदीवर आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या कारवर मिळणाऱ्या ऑफर बद्दल सांगणार आहोत.

ऑफर आणि किंमत

Renault Kwid ची प्रारंभिक किंमत 2.92 लाख रुपये आहे. कंपनी Renault Kwid च्या खरेदीवर संपूर्ण हिंदुस्थानात 35,000 रुपयांचा बेनेफिट्स देत आहे. ज्यात कंपनी 10,000 रुपयांची सवलत आणि 15,000 रुपयांचे एक्सचेंज बेनेफिट्स देत आहे. तसेच कंपनी 10,000 रुपये लॉयल्टी बेनेफिट्सही देत आहे. यासोबतच या कराच्या खरेदीवर कंपनी 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत देत आहे. ही कार तुम्ही लोनवर खरेदी केल्यास कंपनी तुम्हाला याचे पहिले तीन ईएमआय न भरण्याची सूट देणार आहे.

इंजिन

Renault Kwid मध्ये कंपनीने 799 सीसीचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 5678 Rpm वर 53.26 hp पॉवर आणि 4386 Rpm वर 72 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.