Royal Enfield घेऊन येत आहे जबरदस्त बाईक, दमदार पॉवरसह मिळणार आधुनिक फीचर्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield लवकरच हिंदुस्थानात आपली नवीन बाईक लॉन्च करणार आहे. Royal Enfield ची नवीन बाईक अनेकवेळा टेस्टिंग दरम्यान पाहिली गेली आहे. नवीन बाईकसाठी कंपनीने बर्‍याच नवीन नावांचे ट्रेडमार्कही दाखल केले आहेत. यामधील काही बाईक या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बाईकची अपडेट आवर्ती असणार आहे. तसेच कंपनी काही नवीन बाईकही हिंदुस्थानी बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. आज आपण कंपनीच्या अपकमिंग बाईकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Royal Enfield Roadster

कंपनी ही नवीन क्रुझर बाईक 2022 मध्ये लॉन्च करू शकते. काही दिवसांआधीच टेस्टिंग दरम्यान ही बाईक पाहिली गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बाईकमध्ये कंपनी काही नवीन आधुनिक फीचर्स देणार आहे. ज्यात पुल बॅक स्टाईल हँडलबार, टिअर-ड्रॉप टॅंक, स्प्लिट सीट आणि अ‍ॅलोय व्हील्स देण्यात येतील. कंपनी Roadster नावाने ही बाईक लॉन्च करू शकते.

Royal Enfield Hunter 350

कंपनीच्या नवीन बाईकच्या यादीत Royal Enfield Hunter 350 या नावाचाही समावेश आहे. या बाईकबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही आहे. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, ही बाईक रेट्रो क्लासिक स्टाईलमध्ये तयार करण्यात येऊ शकते. या बाइकमध्ये कंपनी 350 क्षमता असलेल्या इंजिनचा उपयोग करणार आहे. ही बाईक सध्या बाजारात उपल्बध असलेल्या क्लासिक 350 मॉडेलपेक्षा अधिक कॉम्पॅक्ट असेल.