Honda Activa ला मिळणार टक्कर, Tvs Jupiter नवीन अवतारात लॉन्च…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर्सने गुरुवारी आपली लोकप्रिय Jupiter नवीन अवतारात लॉन्च केली आहे. या नवीन Jupiter मध्ये 125cc चे इंजिन देण्यात आले आहे. नवीन मॉडलसोबतच कंपनीची 110cc व्हेरिएंट Jupiter स्कूटर देखील बाजारात विक्रीसाठी उपल्बध आहे. या नवीन स्कूटरमध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जे या सेगमेंटच्या इतर स्कूटरमध्ये कोणत्याच कंपनीने याआधी दिले नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे.

फीचर्स आणि इंजिन

Tvs Jupiter 125cc मध्ये कंपनीने नवीन एंट्री इंटेली-गो टेक्नॉलॉजी, अलॉय व्हील्स, डिस्क ब्रेक, बिग-इन-सेगमेंट बूट, यूएसबी सॉकेट आणि एक्सटर्नल इंधन-फिलर लिड सारखे फीचर्स दिले आहेत. कंपनीने यात 124.8cc सिंगल सिलेंडर एअर-कुल्ड इंजिन दिले आहे. जे 8.3 पीएस पॉवर आणि 10.5 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सीव्हीटी गिअरबॉक्ससह येते. या इंजिनला लिनिअर पॉवर आणि टॉर्क आउटपुट देण्यासाठी ट्यून करण्यात आले आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

तीन रंग पर्यायसह उपलब्ध

कंपनीने दावा केला आहे की, Jupiter 125 स्कूटरसाठी पूर्णपणे नवीन चेसिस आणि फ्रेम देखील तयार केले आहे. या स्कूटरला कंपनीने ऑरेंज, ग्रे आणि ब्लू रंगात सादर केलं आहे. या स्कूटरजी डिलिव्हरी लवकरच हिंदुस्थानात सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 125cc सेगमेंटमध्ये ही स्कूटर Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 ला टक्कर देणार आहे.

किंमत

कंपनीने आपल्या नवीन Tvs Jupiter 125cc ची किंमत 73,400 रुपये (एक्स -शोरूम, दिल्ली) इतकी ठेवली आहे.