
जर्मनीची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Volkswagen ने आपल्या नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्ही Taigun चा पहिला टीझर व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ पाहून कंपनी लवकरच आपली ही नवीन कार हिंदुस्थानात लॉन्च करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
व्हिडीओत याचे प्रॉडक्शन-रेडी फ्रंट डिझाईन समोर आले आहे. या एसयूव्हीमध्ये ड्युअल-स्लॅट क्रोम ग्रिल देण्यात आले आहे, जे ड्युअल-लेन्स प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एलईडी डीआरएलने फ्लँक करण्यात आली आहे.
कंपनीने यात 1.0 लिटर, थ्री सिलेंडर टीएसआय टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर, चार सिलेंडर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. जे अनुक्रमे 115hp आणि 175Nm आणि 150hp आणि 250Nm चा टॉर्क जनरेट करतात. दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 6-स्पीड टॉर्क कनव्हर्टर आणि 7-स्पीड डीसीटी स्वयंचलित देण्यात आले आहे. कंपनी आपली ही नवीन एसयूव्ही हिंदुस्थानात कधी लॉन्च करणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही आहे.


























































