
टिंबर मार्केटमधील हार्डवेअर दुकानातील 93 हजारांच्या मालाची चोरी करणाऱ्या रिक्षाचालकाला खडक पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून रिक्षा आणि हार्डवेअर दुकानातील माल जप्त करण्यात आला आहे. नासीर सत्तार खान (वय 38, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
टिंबर मार्केटमधील हार्डवेअर दुकानातील मालाची चोरी करणारा रिक्षाचालक असून तो भवानी पेठेत थांबल्याची माहिती पोलीस शिपाई रवी लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस निरीक्षक राहूल खंडाळे यांनी सापळा रचून नासीर खान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, फहिम सय्यद, संदीप पाटील, रवी लोखंडे, कल्याण बोराडे, समीर माळवदकर, राहूल मोरे, संदीप कांबळे, विशाल जाधव, हिम्मत होळकर, अमेय रसाळ, सागर केकाण यांच्या पथकाने केली.




























































