
कर्नाटकची 20 वर्षीय अवनी आचार्य उडुपी हिने अखिल हिंदुस्थानी चेस मास्टर्स मुंबई क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आठ फेऱ्यांनंतर अवनीसह महाराष्ट्राच्या मयूरेश पारकरने प्रत्येकी 7 गुणांची कमाई केली, मात्र सरस टाय-ब्रेकर स्कोअरच्या आधारे अवनीने बाजी मारली. 1669 रेटिंग गुण असलेले अवनीला मयूरेश पारकरच्या 1757 रेटिंगपेक्षा जास्त टाय-ब्रेकर स्कोअरच्या आधारे विजेता घोषित करण्यात आले. आठ फेऱ्यांपर्यंत चाललेल्या स्पर्धेत अनेक रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. त्यात मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक अव्वल खेळाडूंनी स्पर्धेत आपले कौशल्य सादर केले.