येस बँक घोटाळा – बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले 5 जुलैपर्यंत ईडीच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येस बँक घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेले पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा ताबा ईडीने घेतला आहे. भोसले यांना आज पीएमएलए कोर्टात हजर केले तेव्हा न्यायालयाने 5 जुलैपर्यंत त्यांची कोठडी वाढवली.

एप्रिल ते जून 2018 दरम्यान येस बँकेने डीएचएफएल मध्ये 3,983 रुपयांची गुंतवणूक केली होती. बँकेकडून पंपनीने 750 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्या बदल्यात येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना लाच स्वरूपात 600 कोटी दिले. 2017 आणि 2018 साली डीएचएफएलने बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्या तीन बांधकाम प्रकल्पासाठी आर्थिक सल्लागार व बांधकाम नियोजन म्हणून भोसले यांच्या कंपनीची नियुक्ती केली.

त्यासाठी भोसले यांना 88.82 कोटी रुपये दिले होते. आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणाची सुनावणी घेणाऱया विशेष न्यायालयाने भोसले यांच्याविरोधात वॉरंट बजावले हे वॉरंट विशेष सीबीआय न्यायालयात दाखवले. त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने भोसले यांना आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना भोसले यांना ईडीच्या ताब्यात देण्याचे सोमवारी आदेश दिले. आज सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात भोसले यांना सादर केले होते.