‘अवनी’चा बछडा सापडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । नागपूर

नरभक्षक अवनी वाघिणीच्या दोनपैकी एका बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून त्याला नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पाठविण्यात आले आहे, दुसऱ्या बछड्याचा शोध सुरू आहे.

‘अवनी’च्या बछड्यांना शोधण्यासाठी वनविभागाची अंजी परिसरात 19 तारखेपासून मोहीम सुरू झाली. मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्तींसह दोन पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक दोन्ही बछड्यांचा शोध घेत आहेत. आज त्यापैकी एक सापडला.