चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका ‘या’ 3 गोष्टी नाही तर…

  फ्रीजचा सगळ्यात जास्त उपयोग कधी होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे उन्हाळ्यात… कारण उन्हाळ्यात गार पाणी, बर्फ आणि सरबतासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. फक्त इतकंच नाही तर आपण बऱ्याच गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो. जेणेकरून ते जास्त काळ टिकतील… पण तुम्हाला माहितीये का काही गोष्टी जर आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्यानं आपल्या आरोग्याला हानी होऊ शकते.

बटाटे –

अनेकदा आपण भाज्या खराब होऊ नये म्हणून त्या फ्रीजमध्ये ठेवतो. पण बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कारण बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्यात असलेल्या स्टार्चचे रुपांतर साखरते होते. जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे हानिकारक असू शकतात, विशेषत: ज्या लोकांना मधुमेह आहे… त्या लोकांसाठी.

केळ –

केळ चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, हे अनेकांना माहीत आहे. कारण फ्रीजमध्ये केळ ठेवल्याने ते लवकर खराब होते आणि त्याचा रंगही काळा होतो. खराब केळ्याचे सेवन केल्यानं आपल्या आरोग्याला हानि होऊ शकते.

मध –

तुम्हाला माहित आहे का मध फ्रीजमध्ये कधीच ठेवायला नको. फ्रिजमध्ये मध ठेवल्याने त्याची नैसर्गिक चव खराब होते आणि कमी तापमानात मधाला  ठेवलं तर मधात क्रिस्टल्स तयार होतात. म्हणूनच मध फ्रीजमध्ये ठेवू नये, नेहमी रुम टेम्परेचरवर ठेवा.