
कोरोनाबाधितांवर उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्स टाळा असा महत्वाचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. दुसऱया लाटेत स्टेरॉईड्समुळे अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस झाला होता. ज्यांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासलेली नाही त्यांना रेमडेसिवीर औषध देऊ नका असेही सांगण्यात आले आहे.
अशा आहेत सूचना
- कोरोनाबाधित रुग्णांची सौम्य, मध्यम आणि गंभीर अशी वर्गवारी करावी.
- श्वास घेण्यास त्रास न होणे, नाक वाहणे आणि घशात खवखव ही सौम्य लक्षणे मानून त्या रुग्णांना घरीच उपचार द्यावेत.
- ऑक्सिजन सॅच्युरेशन 90 ते 93 टक्क्यांदरम्यान असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ती मध्यम लक्षणे मानून रुग्णालयात दाखल करावे.
- श्वसनाचा रेट मिनिटाला 30 पेक्षा जास्त असेल, ऑक्सिजन सॅच्युरेशन 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर गंभीर रुग्ण मानून तातडीने आयसीयूत दाखल करावे. त्याला ऑक्सिजन सपोर्ट तातडीने द्यावा.

























































