तुम्ही रात्री स्वेटर घालून झोपता ? असं करत असाल तर ही सवय बंद करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीने बऱ्याच उशिराने राज्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी थंडावा जाणवायला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली असून या थंडीपासून बचावाचे सर्वोत्तम साधन आहे ते म्हणजे स्वेटर. रात्रीच्यावेळी थंडीचा कडाका जास्त जाणवत असल्या कारणाने अनेकजण स्वेटर घालूनच झोपतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते.

स्वेटर हा लोकरीपासून बनवला असल्याने त्याचा धागा हा जाडसर असतो ज्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही आणि बाहेरची थंडी शरीराला झोंबण्यास अडथळा निर्माण होतो. तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही स्वेटर घालून रात्री न झोपणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

स्वेटर जाडसर असल्याने त्याच्यामुळे तुमच्या त्वचेवर चट्टे किंवा पुरळ उठू शकतं. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते ज्यामुळे रात्री स्वेटर घआलून झोपल्यास त्वचेचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्वासाचा त्रास असलेल्यांनी गरम कपडे घालून झोपल्यास त्यांना श्वास घेण्यासही अडचण येऊ शकते. स्वेटर घातल्याने जास्त घाम येऊन रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. यामुळे स्वेटर घालून झोपण्याऐवजी उबदार वातावरणात , पांघरूण घेऊन झोपणं कधीही फायदेशीर ठरू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.