मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडून पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर विभागाचा ‘कवियित्री शांता शेळके साहित्य पुरस्कार’ 2018-19 ‘ललित’ या विषयाकरिता सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच 2019-20 या वर्षासाठीचा ‘विनोदी’ या विषयाकरिता दिला जाणारा पुरस्कार लेखक आणि दैनिक लोकसत्ताचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकत नाही, त्यामुळे पुरस्काराची रक्कम 25, 000 रुपये  एनईएफटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.