
पालिकेच्या तब्बल 6300 कोटींच्या ठेवींमधील फक्त एक कोटी रुपये ऑक्सिस बँकेत ठेवल्या आहेत. पालिकेने 6300 कोटींची रक्कम विविध नऊ बँकांमध्ये ठेवली आहे. पालिका प्रशासनाने बचत ठेवींच्या माहितीचा अहवाल स्थायी समितीला सादर केल्याने ही माहिती समोर आली आहे.
आयसीआयसीआय बँकेमध्ये 329 कोटींची ठेवली आहे. तर म्युनिसिपल कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत पाच कोटींची रक्कम ठेवली आहे. या म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेतून पालिकेला सर्वाधिक 7.5 टक्क्यांचा व्याजदर मिळत आहे. तर ऑक्सिस बँकेतून पालिकेला 6.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. पालिकेने ऑक्सिस बँकेत गुंतवलेल्या एफडीची एक कोटीची रक्कम जुलै 2021 मध्ये मॅच्युअर होणार आहे.





























































