
गणेश तुळशी । अयोध्या
“राम राज्याभिषेक के समय
ये नगरी ऐसी ही सजी होगी..”
प्रभू रामचंद्रांची पवित्र अयोध्या नगरी रामरंगासोबतच शिवसेनेच्या भगव्या रंगात न्हाऊन निघाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील आगमनाला आता अवघे काही तासच उरले असून त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्यावासीय आतूर झाले आहेत. अयोध्येतील प्रत्येक चौराहा, प्रत्येक रस्ता आणि लहान मोठ्या गल्ल्यातही शिवसेनेचेच भगवे झेंडे डौलाने फडकत आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचेच फलक झळकताना दिसत आहेत. २०-२० फुटांवर लागलेले हे फलक आणि शिवसेनेचे भगवे ध्वज, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे अतिभव्य कट आऊट्स् यामुळे अयोध्या शिवसेनामय झाली आहे.पवित्र शरयू नदीचा प्रवाह देखील या भगव्या ध्वजाच्या साक्षीने दौडत आहे. सर्वत्र फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना असाच भगवा माहौल आहे. या नटलेल्या, थटलेल्या नगरीचे हे रूप अयोध्येची जनता कौतुकाने न्याहाळत आहे. “प्रभू रामचंद्रजी जब बनवास खतम कर के अयोध्या वापस पहूँचे और उनका राज्याभिषेक हुआ तब ये अयोध्या नगरी ऐसीही सजी होगी..उसके बाद पहली बार अयोध्या इस तरह से सजधजकर तैयार है..बडा अच्छा लग रहा है. अब भव्य राममंदिर जरूर बनेगा..” अयोध्येतील द्वारकादास द्वीवेदी हा नागरिक मध्यरात्रीनंतर तयारीची पाहणी करत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी भरभरून बोलत होता…अयोध्या अगदी तशीच नटली आहे..!

























































