#AYODHYAVERDICT परळीत तीनही राम मंदिरांना पोलीस बंदोबस्त

1156

अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणे येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभरात हाय अलर्ट जारी केलेला आहे. कुठलीही अनपेक्षित घटना होऊ नये यासाठी परळीतही पोलीस प्रशासन सज्ज राहिलेले दिसून येत आहे. शहरात असलेल्या तिन्ही राम मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेला असल्याचे दिसून येत आहे. नाशिक प्रमाणे वैजनाथाच्या पावन भूमितही गोराराम, काळाराम व सावळाराम असे तीन मंदिरे आहेत.

शहरात असलेल्या गोराराम मंदिर, काळाराम मंदिर आणि सावळाराम मंदिर अशा तीनही राम मंदिरात पोलिसांनी आपला बंदोबस्त लावला आहे. अयोध्या राम जन्म भूमी प्रकरणाचा निकाल कुठल्याही क्षणी येऊ शकतो. म्हणूनच शहरातील राम मंदिरांना बंदोबस्त केला गेला असल्याचे दिसते.

निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्याचे आवाहन परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम आणि संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालासाहेब पवार यांनी केले आहे. या प्रकरणी येणारा निकाल हा देशातील सर्वोच्च न्यायसंस्थे कडून येणारा आहे, त्याचा आदर आपण सर्वांनी करणे आपले कर्तव्य आहे .दरम्यान शहरात कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या