
एसएस राजमौली यांचा ब्लॉकबस्टर “बाहुबली” चित्रपटगृहांमध्ये येत आहे. परंतु हा चित्रपट आता एका आगळ्या शैलीत पाहायला मिळणार आहे. “बाहुबली: द एपिक” नावाचा हा नवीन चित्रपट बाहुबली भाग १ आणि भाग २ ला असे मिळून करण्यात आलेला आहे. हिंदुस्थानातील चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी दोन भागांचा चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रविवारी, निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये प्रभासने गमतीशीरपणे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. तो म्हणाला, “हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये येईल.” त्यानंतर तो हसत म्हणाला, “कदाचित.” त्यानंतर स्क्रीनवर असे दिसले की, चित्रपटाचा परदेशात प्रीमियर २९ ऑक्टोबरला होणार आहे. हिंदुस्थानात प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी सुरू हा चित्रपट परदेशात रिलीज होणार आहे.
हा चित्रपट नवीन नसला तरी, त्याच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल प्रचंड उत्साह आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, जगभरात चित्रपटाचे आगाऊ बुकिंग ₹५ कोटींपेक्षा जास्त झाले आहे. फक्त उत्तर अमेरिकेत $२,००,००० किमतीचे तिकिटे (अंदाजे ₹१.६ कोटी) आधीच विकली गेलेली आहेत. व्यापार तज्ञ म्हणतात की पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला इतका जोरदार प्रतिसाद दुर्मिळ आहे आणि बाहुबलीचे चाहते अजूनही आहेत.
चित्रपटाचे सर्व मूळ कलाकार प्रभास, राणा दग्गुबाती, तमन्ना, अनुष्का शेट्टी, सत्यराज आणि रम्या कृष्णन परत मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. पुन्हा रिलीज झाल्यामुळे, प्रेक्षकांना अमरेंद्र ते महेंद्र बाहुबली यांची संपूर्ण कथा एकाच वेळी, कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहता येईल. व्यापार तज्ञांच्या मते, हा अनुभव चित्रपटाला भावनिकदृष्ट्या अधिक प्रभावी बनवेल यात दुमत नाही.
“बाहुबली: द एपिक” हा चित्रपट हिंदुस्थानातील सर्वाधिक कमाई करणारा पुन्हा प्रदर्शित होऊ शकतो. काही तज्ञ असेही म्हणतात की हा चित्रपट स्वतःचाच विक्रम मोडू शकतो.





























































