बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी दोघांचा जामीन फेटाळला

अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष मकोका न्यायालयाने फेटाळला. दोन्ही आरोपींचे सहआरोपींशी जवळचे संबंध असल्याचे कॉल डेटा रेकॉर्डवरून सिद्ध होत आहे, असा दावा करीत सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध केला होता. हा दावा ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज धूडकावला. 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री वांद्रे (पूर्व) परिसरात तीन हल्लेखोरांनी सिद्दिकाRची गोळय़ा घालून हत्या केली होती.