राजगृहावर दगडफेक करणारा मुख्य आरोपी सापडेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील हिंदू कॉलनीतील ‘राजगृह’ या बंगल्यावर दगडफेक करणारा मुख्य आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. माटुंगा पोलीस त्या हल्लेखोराचा कसून शोध घेत असून त्याची माहिती देणाऱयास रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे.

तमाम देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘राजगृह’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर 8 जुलै रोजी दगडफेक करण्यात आली होती. शिवाय आरोपीने बंगल्यातील झाडांची नासधूस करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी परळ टीटी येथे राहणाऱया उमेश जाधव या एका आरोपीला पकडले. मात्र दगडफेक व झाडांची नासधूस करणारा मुख्य आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. तो आरोपी परिसरातील सीसीटीव्ही पॅमेऱयात पैद झाला असून त्याआधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. तो ठाण्यापर्यंत चालत गेल्याचे समजते. त्यामुळे त्या माथेफिरूची कोणाला माहिती मिळाल्यास तत्काळ माटुंगा पोलिसांकडे संपर्प साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.