
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘बबिताजी’ अर्थात अभिनेत्री मुनमून दत्ता हिला अखेर सोमवारी अटक करण्यात आली. कोर्टाच्या आदेशानुसार मुनमून हांसी येथे पोलिसांसमक्ष हजर झाली. या वेळी अटकेची कारवाई पूर्ण करून मुनमूनची चार तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यू-टय़ूबवर एक व्हिडीओ प्रसारित करून दलितांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मुनमून दत्ता अडचणीत आली आहे. दलित अधिकार कार्यकर्ते रजत कन्सल यांच्या तक्रारीवरून तिच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशानुसार मुनमून दत्ता सोमवारी पोलीस उपअधीक्षक विनोद शंकर यांच्यासमक्ष हजर झाली.




























































