
श्री. बाबुलाल वंजी फुलपगारे यांचे आज सोमवार दि. ०६ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन बहिणी, सून, जावई, नात नातू असा परिवार आहे.
कै. बाबुलाल फुलपगारे यांनी कृषी महाविद्यालय राहुरी येथे 34 वर्षे लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते धुळे येथे स्थायिक झाले. त्यांचा मदतीचा स्वभाव ही त्यांची ओळख होती. सोमवारी रात्री धुळे येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.






























































