भाजप, आरएसएस संविधान विरोधी; दलित समाजास त्यांच्या कचाट्यातून सोडवणार- पोटभरे

395

भाजप सरकार व आरएसएस संविधान विरोधी असून त्यांनी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या नावाखाली समाजाची दिशाभूल केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत समाजाने एकप्रकारे भाजपला अप्रत्यक्ष सहकार्यच केले होते, ते पाप आता होऊ देणार नाही. भाजपच्या कचाट्यातून दलित समाजाला सोडवायचे आहे. जो कोणी भाजपची दलाली करेल त्याला सोडणार नाही, असे प्रतिपादन बाबुराव पोटभरे यांनी माजलगाव येथे केले. माजलगाव येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित ‘संविधान बचाव, देश बचाव’ संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

पोटभरे पुढे म्हणाले की, आरएसएस व भाजप हे दलित विरोधी असून आता भाजप हटवायचे काम करायचे आहे. दलित समाजाची मते वंचितमुळे फुटली व या मतफुटीमुळे भाजपचे 19 खासदार निवडून आले. आता तसे घडू देणार नाही. माजी मंत्री प्रकाश सोळंके व आमचे 15 वर्षे पटत नव्हते, हे सर्वश्रुत आहे. मात्र मनुवादी विचारांचे सरकार सत्तेवर पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आता सोळंके यांनी दलित समाजाचे डॉक्टर म्हणून भूमिका बजावावी, असेही पोटभरे यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या