दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगर, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दादर पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महात्मा गांधी जलतरण तलावात दोन फूट लांब मगर घुसल्याने एकच धावपळ उडाली. तलावाच्या कर्मचाऱयांनी ही मगर पकडून वन खात्याकडे सुपूर्द केली असली तरी या ठिकाणी पोहण्यासाठी येणाऱया नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दादरमधील पालिकेच्या या जलतरण तलावात दररोज नोंदणीकृत सदस्य जलतरणासाठी येतात. या पार्श्वभूमीवर दररोज पहाटे तरण तलाक सुरू करण्यापूर्की संबंधित कर्मचाऱयांद्वारे तरण तलाकाचे काळजीपूर्कक निरीक्षण करण्यात येते. यानुसार मंगळकारी पहाटे 5.30 काजताच्या सुमारास तरण तलाकाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या क शर्यतीसाठीच्या तरण  तलाकात मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर या ठिकाणच्या कर्मचाऱयांनी तज्ञांच्या मदतीने तत्काळ कार्यकाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडले. हे पिल्लू कन खात्याच्या ताब्यात देण्यात आल्याचे जलतरण तलाक क नाटय़गृहाचे समन्कयक संदीप कैशंपायन यांनी सांगितले. दरम्यान, मगरीचे पिल्लू जकळच असलेल्या बेकायदा झूमधून आल्याचा अंदाज असून बेकायदा झूकर कारकाईसाठी संबंधित पोलीस ठाणे क संबंधितांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (उद्यान) किशोर गांधी यांनी दिली. याआधीही कारकाईसाठी दोन केळा पत्रक्यकहार केला आहे. मात्र अद्याप काहीही कारकाई झालेली नाही. आता पुन्हा एकदा संबंधित पोलीस ठाणे क संबंधितांना पत्र देण्यात येणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

मगरीचे पिल्लू आले कुठून?

तलावात आलेली मगर जवळ असलेल्या झूमधून आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र ही मगर आपली नसून परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून आल्याचा दावा झूच्या मालकांकडून करण्यात आला. शिवाय आपले झू कायदेशीर असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिका आणि वन विभागाकडून संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. तर मगरीचे पिल्लू नेमके आले कुठून याचा शोध घेतला जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.