
सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. असाच एक हत्तीच्या पिल्लाच्या नृत्याचा व्हिडीओ नेटिझन्सने मन जिंकून घेतोय. व्हिडीओमध्ये हा हत्ती चक्क एका भजनाच्या तालावर मंदिराच्या आवारात नाचताना दिसत आहे. केरळ राज्यातील गुरूवायूर मंदिराने हे हत्तीचं पिल्लू एका दुसऱया मंदिरात पाठवले आहे. तामीळनाडूतील थुथुकुडी जिह्यातील थेरूचेंदूर मंदिरात हत्तीच्या पिल्लाला नेलेले आहे. तिथे हत्ती काही लोक गात असलेल्या भजनावर ठेका धरत नाचू लागतो. गणपतीच्या दिवसात हत्तीच्या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. हत्तीचे पिलू अत्यंत लयबद्ध आणि अचूक तालावर नृत्य करत आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सच्या भरभरून कमेंट्स येत आहेत.
































































