Breaking – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे यांची भाजपने केली स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती

बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे सचिव तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आहे.

बदलापूरमधील एका नामवंत शाळेत 12 – 13 ऑगस्ट रोजी सफाई कर्मचाऱ्याने 4 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यापैकी एका मुलीने तिला त्रास होत असल्याचे तिच्या पालकांना सांगितले. या मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेले. वैद्यकीय अहवालात मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे समजले. 16 ऑगस्ट रोजी कुटुंबीय अहवाल घेऊन शाळेत गेले, परंतु शाळेने सगळे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी 11 तासानंतर शाळेच्या सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. नंतर अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या एनकाऊन्टरमध्ये मृत्यू झाला.