बदलापूरच्या सूरज स्केटिंग ऍकॅडमीच्या मुलांचा विश्वविक्रम, सलग 96 तास स्केटिंगचा विक्रम साकारत गिनीज बुकात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग 96 तास स्केटिंग करून बदलापूरच्या सूरज स्केटिंग अॅपॅडमीच्या 41 मुलांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवून आपले व राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

बेळगाव येथे पार पडलेल्या 96 तास सलग रोलर स्केटिंग करण्याच्या विक्रमामध्ये 496 खेळाडूंचा समावेश होता. हा कार्यक्रम 28 मे ते 3 जूनपर्यंत शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब यांच्यामार्फत घेण्यात आला. यामध्ये बदलापूरच्या सूरज स्केटिंग अॅपॅडमीच्या 41 मुलांनी शिक्षक मनीषा काwशिक गरवालीया व सूरज काwशिक गरवालीया यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाखाली ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले व आपल्या बदलापूर शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. विघ्नेश पवार, शमिका ओक, हर्ष ओक, काव्या शिंदे, देवांग राऊत, श्रवण सरखोत, ध्रुव तावडे, कुशल कुलकर्णी, ओम सिंग, सर्वज्ञ सातार्डेकर, प्रियाशू सील, गार्गी गायकवाड, विघ्नेश कोयंडे, यश कटकोळे, अर्जुन क्युरील, सिद्धार्थ क्युरील, दिवित सिंग, आबिरा बोस, चिन्मयी पढेर , पैवल्य नहीरे, स्मित पाटील, विराज जाधव, सोहम हिर्लेकर, आदित्य ताजणे, सोहम मंडलिक, इप्सा माशाळकर, अद्या सिंग, नुशांत निकम, प्रथमेश सोनवणे, ज्योती चौरासीया, अथर्व हातणकर, रिदिमा वाबळे, तनिष गुरव, शार्दुल सग्गम, आरव ढवळे, अर्णव ढवळे, मुग्धा निकम, तनिष्का शेरे, अर्पिता वानखेडे, रुध्वी शिंदे, ओवी लवाटे अशी या पराक्रमी स्केटिंगपटूची नावे आहेत.

विक्रमी स्केटर कन्येचा आमदार सुनील राऊत यांच्याकडून सत्कार

बेळगाव, कर्नाटक येथे आयोजित विश्वविक्रम (गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड) मध्ये रोलर स्केटिंग प्रकारात शानदार प्रदर्शन करीत  मुंबई (मीरा रोड) येथील कुमारी अन्विता संजय बुटे (11) हिने शानदार रोलर स्केटिंग करून ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये सुवर्णाक्षरात आपले नाव नोंदविले आहे. हा विक्रम नोंदविल्याबद्दल शिवसेना आमदार सुनील राऊत, मुलुंड विभागाचे शिवसेना उपविभागप्रमुख दिनेश जाधव, अनंत पाताडे  आणि माजी शिवसेना शाखाप्रमुख नीलेश मोरे, दीपक सावंत यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या  विक्रमाची नोंद करताना तिचे स्केटलाइफ अॅपॅडमी, मीरा रोडचे  प्रशिक्षक संतोष मिश्रा आणि प्रफुल खरात यांनी मार्गदर्शन केले.