डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सायना नेहवालकडून पुन्हा निराशा

268

हिंदुस्थानची ‘शटलक्वीन’ सायना नेहवाल हिला या वर्षी सूर काही गवसेना. तिची अपयशाची मालिका डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही सुरूच राहिली. सयाका ताकाहाशी हिच्याकडून महिला एकेरीत सायना नेहवालला 21-15, 23-21 अशा फरकाने हार सहन करावी लागली. त्यामुळे पहिल्याच फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले.

पुरुषांच्या एकेरीत समीर वर्माने कांता सुनेयामा याला 21-11, 21-11 अशा सरळ दोन गेममध्ये हरवले आणि आगेकूच केली. अश्विनी पोनप्पा व सात्त्विक रेड्डी यांना वॉकओव्हर देण्यात आले. प्रणव चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांनी मिश्र दुहेरीत पुढे पाऊल टाकले. या जोडीने मार्विन सेडेल व लिंडा एफलर या जोडीला 21-16, 21-11 अशा फरकाने हरवले.

आपली प्रतिक्रिया द्या