लघुशंकेसाठी बसमधून तो उतरला आणि सव्वा लाखांचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने पळवली

511

नांदेड येथून लातूरला येणाऱ्या एका प्रवाशांची बॅग शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने पळवली. त्यातील सुमारे १ लाख १४ हजाराचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप मारुतराव गायकवाड राहणार वसमत हे नांदेड येथून लातूरला एसटी महामंडळाच्या एम एच 20 बीटी 36 71 क्रमांकाच्या बसने येत होते. अहमदपूर बस स्थानकात लघुशंका करण्यासाठी ते खाली उतरले. त्यांची बॅग बसमध्येच होती. ते लघुशंका करुन परत येईपर्यंत बस निघून गेलेली होती. लातूरला त्यांनी आपल्या मित्राला कळवले व बसमधील बॅग घेण्यासाठी सांगितले. बस लातूर बस स्थानकात पोहचली. मात्र त्यात संदिप गायकवाड यांची बॅग नव्हती. अज्ञात व्यक्तीने अगोदरच ती चोरून नेलेली होती. लातूर येथे येऊन संदिप गायकवाड यांनी चोरीची तक्रार गांधी चौक पोलीस ठाण्यात दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या