
द लॉस्ट लेजंट्स या अॅडव्हेंचर अॅनिमेशन सिरिजचा पाचवा सिझन टाटा स्काय घेऊन आले आहे. ग्राफिक इंडिया आणि अका मीडियावर्क्सची निर्मिती असलेली ही सिरीज 16 भागांची असून इंग्लिश आणि हिंदी भाषेत पाहता येणार आहे.
माहिष्मती साम्राज्याच्या रक्षणासाठी बाहुबलीने कटप्पा आणि भल्लालदेव यांच्यासोबत निप्पॉन जपान येथे आपली मोहीम सुरू केली आहे. निप्पॉनमधील लढाई ते निर्दोष लोकांशी सुटका यासोबतच अनेक नवीन रहस्य शो मध्ये उलगडतील. शोच्या या आधीच्या सीजनला उदंड प्रतिसाद मिळाला असून त्याचे मिलियन फॅन्स आहेत. टाटा स्काय फन लर्नवर रोज सायंकाळी 6 वाजता आणि टाटा स्काय मोबाईल अँप लाईव्ह टीव्हीवर हा शो पाहता येईल.
























































