ट्रिपल तलाक प्रकरण- मुंब्य्रातील आरोपीला हायकोर्टाकडून तूर्तास जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
triple-talaq

आपल्या पत्नीला व्हॉटस्ऍपद्वारे ट्रिपल तलाक देणाऱया पतीला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. राज्यात प्रथमच ट्रिपल तलाकप्रकरणी मुंब्य्रातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने तूर्तास मंजूर केला.

इम्तियाज पटेल असे त्या पतीचे नाव असून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्याचा अर्ज हायकोर्टाने स्वीकारला आहे. हा अर्ज स्वीकारतानाच सोशल मीडियावर पत्नीची कोणत्याही प्रकारे बदनामी करू नये अशी तंबीही याचिकाकर्त्याला दिली. इम्तियाज पटेल याचा विवाह एका उच्चशिक्षित महिलेशी झाला. ती गर्भवती असतानाच माझे दुसऱया मुलीवर प्रेम आहे, मला दुसरे लग्न करायचे आहे असे सांगून इम्तियाजने तिला एक दिवस व्हॉटस्ऍपवर ट्रिपल तलाक दिला. पीडित महिलेने यप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इम्तियाज यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने पटेल यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला.