
आरोपीवर गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्याला अप्रत्यक्ष सजा देण्यासाठी जामीन नाकारता येणार नाही, असे येथील विशेष न्यायालयाने म्हटले आहे. बारा लाखांची कथित लाच घेताना पकडलेल्या ऋषी राज याला जामिनावर सोडताना, गुन्हा सिद्ध होईतो कुठलाही आरोपी हा निरपराधच समजला जातो हे फौजदारी न्यायप्रक्रियेचे मूलभूत तत्त्व आहे, असे विशेष न्यायमूर्ती सुनेना शर्मा यांनी सांगितले.

























































