‘सेक्स्टॉर्शन’ टोळीतील आरोपी शेतकऱयाला 5 महिन्यांनी जामीन

‘सेक्स्टॉर्शन’ टोळीत सहभाग असल्याच्या आरोपावरून राजस्थानमधून अटक केलेल्या शेतकऱयाला पाच महिन्यांनंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या प्रकरणातील सहआरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी काहीही केलेले नाही, असे ताशेरे ओढत न्यायालयाने आरोपी प्रेमचंद किसन शर्माची दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. त्याला खोटय़ा गुह्यात गोवल्याचा युक्तिवाद अॅड. सुनील पांडे यांनी केला. या युक्तिवादाची न्यायाधीश एस. एम. तपकिरे यांनी गंभीर दखल घेतली आणि कठोर अटी-शर्ती घालून शर्माची जामिनावर सुटका केली.