ईडी, सीबीआयला दणका! राणा कपूर यांना जामीन; चार वर्षांनंतर तुरुंगाबाहेर

येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने सीबीआयच्या गुह्यात जामीन मंजूर केला. कथित कर्ज घोटाळा प्रकरणात सीबीआय व ईडीने नोंदवलेल्या सर्व गुह्यांत जामीन मिळाला आणि राणा कपूर हे चार वर्षे एक महिन्याच्या न्यायालयीन कोठडीनंतर तुरुंगातून बाहेर आले. त्यामुळे ईडी आणि सीबीआय या दोन्ही पेंद्रीय तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने 7 मार्च 2020 रोजी राणा कपूर यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल केले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईडीच्या गुह्यात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर चार महिन्यांत सीबीआयने 400 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात दाखल केलेल्या गुह्यात कपूर यांना दिलासा मिळाला. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी कपूर यांना जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर जामीनाची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते तळोजा तुरुंगातून बाहेर आले. त्यांच्या वतीने सिनियर काwन्सिल आबाद पोंडा, अॅड. राहुल अग्रवाल व अॅड. जस्मिन पुराणी यांनी बाजू मांडली. आपल्याला नाहक गोवल्याचा दावा करीत कपूर यांनी जामीनासाठी दाद मागितली होती.

 

घोटाळय़ात नाहक गोवले!

सीबीआयने आरोपपत्रामध्ये जे आरोप केले, त्या आरोपांमध्ये राणा कपूर यांचा संबंध कुठेही उघड होत नाही. त्यांच्याविरोधात कुठल्याही आरोपात तथ्य दिसून येत नाही. त्यांना कथित कर्ज घोटाळय़ात नाहक गोवण्यात आले, असा युक्तिवाद करण्यात आला होता. हा युक्तिवाद न्यायालयाने विचारात घेतला.