राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला; आरोपीला जामीन

mumbai-high-court

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मयूर जाधव यांच्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी प्रतीक लोखंडेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीविरोधातील पुराव्यांमध्ये विसंगती आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने लोखंडेला 20 हजारांच्या रोख रक्कमेच्या जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले.

केबल व्यवसायातील पूर्ववैमनस्यातून मयूर जाधव यांच्यावर 18 ऑक्टोबर 2021 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याप्रकरणी आरोपी प्रतीक लोखंडे व इतर दोघांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोखंडे मागील 1 वर्षे 10 महिने तुरुंगात आहे. त्याने अॅड. सत्यम निंबाळकर यांच्या माध्यमातून जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.