‘बाईपण भारी देवा’ने तीन दिवसांत जमवला 6.45 कोटींचा गल्ला

नुकताच प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी विशेषतः महिलावर्गाची मोठी गर्दी होत आहे.

अवघ्या तीन दिवसांत 6.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांचे आभार मानताना केदार शिंदे यांनी म्हटलेय, अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीरपर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली. मात्र खऱया अर्थाने ‘सही’नंतर ‘बाईपण भारी देवा’चं हे यश पाहत आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खूप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन.