
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्यावर कोरोना होत नाही असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. काही मराठी वेबसाईटने त्यच्या बातम्याही छापल्या आहेत. पण हा दावा कितपत खरा आहे, त्याची पडताळणी सामनाच्या टीमने केली आहे.
काय आहे दावा ?
सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, बाजरीची भाकरी खाल्ल्याने कोरोना होत नाही. तसेच कोरोना झाल्यानंतर बाजरीची भाकरी खाल्ल्याने काहीही होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही ही बाब मान्य केल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे सत्य
द क्विंटने याबाबत वृत्त दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या एका पत्रकात ज्वारी, बाजरी खाणे चांगले असल्याचे म्हटले आहे. परंतु बाजरी खाल्याने कोरोना बरा होतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेले नाही. फेसबुकवरील ही पोस्ट खोटी असल्याचे समोर आले आहे.
गहू, ज्वारी आणि बाजरीमध्ये प्रथिनं असतात, ते आरोग्यासाठी चांगले असतात पण त्यामुळे कोरोना बरा होत नाही असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.



























































