रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा जामीन अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी नामंजूर केला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्या रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे 30 नोव्हेंबर 2020 रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेली असून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे हा अनेक महिने पोलिसांना गुंगारा देत होता. एका वृत्तपत्राचा संपादक असलेल्या बाळ बोठेला हैदराबादमधून अटक करुन आणले होते. दरम्यान, बाळ बोठे याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेला होता. न्यायालयाने यापूर्वीही अटकपूर्व अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अटकेतील बोठे याने खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जावर गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी मुख्य सरकारी वकील डी. आर काळे यांनी परिस्थीतीजन्य पुरावे बाळ बोठे विरोधात असल्याचा युक्तीवाद केला. सुनावणीअंती खंडपीठाने बाळ बोठेचा जामीन अर्ज नांमजूर केला.