हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीत झळकले बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींचे बॅनर

263

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

आय़सीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मधील टीम इंडिया आणि पाकिस्तानमधील मॅनचेस्टर येथील लढतीचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून क्रीडा प्रेक्षकांनी गर्दी केली. इंग्लंड येथे विश्वचषक बघण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षकांनी आगरी-कोळी टोप्या परिधान करून सामन्याचा आनंद लुटला. या लढतीदरम्यान हिंदुस्थानी प्रेक्षकांनी हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर झळकावले.

इंग्लंड येथे विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या दिवा गावातील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर यांनी न्यूझीलंड विरुद्ध होणारा सामना पावसामुळे रद्द झाल्याने हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. मँचेस्टर येथे रंगलेल्या या सामन्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर झळकावले. या बॅनरवर ‘हिंदुस्थान के दो शेर’ असे लिहिण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या