
प्रभादेवी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमीतर्फे महाराष्ट्रातील एक हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी (आयएएस) परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आज, 19 जूनपासून प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (नागरी सेवा) आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस या स्पर्धात्मक परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा यशस्वी टक्का वाढावा यासाठी 2001 सालापासून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव विद्या प्रबोधिनी ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमी’ची स्थापना करण्यात आली. ऍकॅडमीचे 2014 पासून 65 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
ऍकॅडमीच्या वतीने घेण्यात येणाऱया निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील एक हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीचे मोफत प्रशिक्षण राज्यातील 36 जिह्यांत ऑनलाइन देण्यात येणार आहे. यूपीएसीबद्दल जागृती वाढवण्यासाठी इयत्ता 11वीपासूनच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावे, असे आवाहन शिवसेना उपनेते, बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमीचे संस्थापक संचालक विजय कदम यांनी केले आहे. संपर्क – बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकॅडमी, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी, मुंबई- 25 दूरध्वनी 022-24221166/24371177
n ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी www.svpias.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
n ऑनलाइन नोंदणी कालावधी 19 जून ते 22 जुलै 2020
– ऑनलाइन राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा Š 26 जुलै 2020, वेळ – सकाळी 11 वाजता
– प्रवेश परीक्षा निकाल- 27 जुलै 2020
– ऑनलाइन प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया- 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत पूर्ण करणे अनिवार्य आहे.
– ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाला सुरुवात- 4 ऑगस्ट 2020
– अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांकरता एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स सुरू करण्यात येणार आहे.

























































