बलुचिस्तानच्या ग्वादर बंदरात दहशतवादी हल्ला, आठ दहशतवादी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलुचिस्तानमधील ग्वादर या बंदरावर दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानी माध्यमांनी या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, बंदुका आणि स्फोटकं घेतलेल्या या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या ग्वादर बंदर प्राधिकरणात घुसखोरी करत अंदाधुंद गोळीबार केला.

त्यानंतर ते बंदरात असलेल्या एका इमारतीत घुसले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेराव टाकून प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस आणि सुरक्षा दलांनी आठ दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

ग्वादर हे बंदर पाकिस्तामधलं तिसरं सगळ्यात मोठं बंदर आहे. येथे चिनी इंजिनियर एका प्रकल्पाच्या कामासाठी आले होते. त्याखेरीज चिनी कामगारही तिथे काम करत होते. त्याच दरम्यान हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.