
केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील बंदी ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. याआधी 1 जूनपासून 31 ऑक्टोबरपर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली होती.
देशातील साखरेच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने निर्यातबंदीची मुदत वाढवली आहे. हिंदुस्थान जगातील दुसऱया क्रमांकाचा साखर निर्यातदार आहे. बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, दुबई या देशांना हिंदुस्थानातून मोठय़ा प्रमाणात साखरेची निर्यात केली जाते.




























































