वांद्रे गरीब नगरमधील 94 बांधकामांवर पश्चिम रेल्वेचा बुलडोझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकालगत असलेल्या गरीब नगर परिसरातील उर्वरित 94 बांधकामे हटविण्याची कारवाई पश्चिम रेल्वे प्रशासनाने आज सुरू केली. यापूर्वी मे महिन्यात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम राबविली होती. मात्र, पुनर्वसनासाठी पात्र कुटुंबांच्या झोपड्या पर्यायी घरांची व्यवस्था होईपर्यंत कायम ठेवण्यात आल्या होत्या. गरीब नगरमधील 100 पात्र कुटुंबांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यांना कुर्ला येथील पर्यायी सदनिकांचा ताबाही देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पात्र रहिवाशांना संबंधित जागा एका आठवडय़ात रिकामी करण्याचे निर्देश दिले होते.