
देशात घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी पकडल्यानंतर महाराष्ट्र एटीएसनेदेखील धडक कारवाया सुरू केल्या आहेत. अटक दहशतवाद्यांच्या संपका&त असलेले झाकीर शेख आणि रिजवान मोमीन या दोघांना पकडल्यानंतर एटीएसने या दोघांच्या संपका&त असलेल्या इरफान रेहमत अली शेख (50) याला आज अटक केली. इरफानला कोर्टात हजर केले असता 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वांद्रे पूर्वेकडे राहणारा इरफान टेलरिंगचा काम करत होता.
दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसने दहशतवादी कृत्य करण्यासाठी गँगस्टर्सच्या संपर्कात असलेल्यांना रडारवर घेत अटकेच्या कारवाया सुरू केल्या. त्यानुसार एटीएसने पहिली कारवाई करत जोगेश्वरीत राहणारा झाकीर शेख याला अटक केली. त्यानंतर झाकीरच्या संपर्कात असलेल्या रिजवान मोमीन याला मुंब्रा येथून पकडले. गेल्या दोन महिन्यांपासून मुंब्य्ा्रात राहणारा रिजवान तेथे खासगी क्लासेस घेत होता. त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्य सापडले. तोदेखील वांद्रय़ात राहत होता. दरम्यान, या दोघांच्या संपका&त वांद्रे पूर्वेकडे राहणारा इरफान रेहमान अली शेख हा टेलर असल्याचे तपासात निष्पन्न होताच एटीएसने त्याला बुधवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. लेडीज टेलरचे काम करणाऱया इरफानकडे 49 हजार रोख व काही आक्षेपार्ह साहित्य सापडले. चौकशीअंती आज सकाळी त्याला अटक करण्यात आली. इरफानकडे सापडलेली रोकड त्याला घातपात घडविण्यासाठी देण्यात आली असावी असा एटीएसला संशय आहे. पुढील तपास एटीएस करत आहे.























































