सहजीवनाची 72 वर्षे, 101 वर्षांचे आजोबा अन् 90 वर्षांच्या आजीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूचे 101 वर्षांचे आजोबा आणि 90 वर्षांची त्यांची पत्नी… त्यांच्या लग्नाला 72 वर्षे झालीत. त्यांच्या यशस्वी सहजीवनाचे गुपित उलगडणारा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नव्या पिढीला सुखी संसाराची गुरुकिल्ली देत आहे.

दक्षिण बंगळुरूमध्ये राहणाऱया आजी-आजोबांच्या व्हिडीओला ‘इतनी सी खुशी, इतनी हंसी…’ या गाण्याची जोड दिली आहे. व्हिडीओत आजी कधी मटार सोलताना तर कधी गजरा गुंफताना दिसतात, तर आजोबा वर्तमानपत्राचे वाचन करताना. दोघेही संसार सुखाचा करण्यासाठी आणि पती-पत्नीमधील नातं अधिक घट्ट ते काही टिप्स देतात. ते सांगतात, दिवसातून एकदा एकत्र जेवा. प्रसंग कुठलाही असू दे एकमेकांचा हात हातात धरा. काही वेळला तोंड आणि कान बंद ठेवा. निदान तशी ऑक्टिंग करा. संसारात सॉरीला खूप महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही आधी सॉरी म्हणा. आयुष्यभर एकमेकांची साथ करण्याचे वचन दिलं असून तेच पूर्ण करतोय, असे सांगायला आजी-आजोबा विसरत नाहीत. हा व्हिडीओ नेटिजन्स मोठय़ा प्रमाणात शेअर करत असून त्याला एक कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.