शाहीन बाग आंदोलनाचे पडसाद बीडमध्ये, राष्ट्रीयकृत बँकेतील तीन हजारांपेक्षा जास्त खाती बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सीएए, एनआरसी विरोधात देशभरात विरोध होत असतानाही केंद्र सरकार सीएए कायद्यावर ठाम आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात केंद्र सरकारविरोधात शाहीन बाग आंदोलनातून असहकार आंदोलन पुढे येत असून जिल्ह्यातून सुमारे तीन हजारापेक्षा जास्त लोकांनी आपले राष्ट्रीयकृत बँकेतील खाते बंद केली आहेत.

केंद्रातील मोदी-शहा सरकारच्या बगलेत असलेल्या रिलायन्स ग्रुपलाही शाहीन बाग आंदोलनाचा जबरदस्त फटका बसत असून दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी जीओचे कार्ड बंद करून अन्य कंपन्यांची मोबाईल सेवा सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर रिलायन्स पेट्रोल पंपावरून पेट्रोल-डिझेल भरणेही बंद केल्याचे सांगण्यात येते.

सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग आता देशभरात सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातही शाहीनबाग आंदोलनाचे लोण पसरले असून गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून माजलगाव येथून सुरू झालेलं शाहीनबाग आंदोलन बीड, परळी, अंबाजोगाई यासह अन्य तालुक्यात आणि गावागावात जाऊन पोहचलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरू असून या आंदोलनात आता संविधान बचाव म्हणत जो तो सहभागी होताना दिसत आहे.