
आर्थिक वर्ष समाप्तीला आता काही दिवस उरले आहेत. अनेक कामे बँकांशी संबंधित असल्याने बँकांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. बँकेत तुमचे एखादे महत्त्वाचे काम असेल तर ते उद्याच (शुक्रवारी) उरकून घ्या. कारण 27 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सात दिवस बंद राहणार आहेत. फक्त 30 मार्च आणि 3 एप्रिल हे दोन दिवसच बँकेतील दैनंदिन कामकाज सुरू राहील.
27 मार्च रोजी चौथा शनिवार, 28 मार्च रोजी रविवार, 29 मार्च रोजी होळी असल्यामुळे बँका तीन दिवस बंद राहणार आहेत.30 मार्च रोजी फक्त बिहारच्या पाटणा शहरातील बँका बंद राहतील.
कधी बंद आणि कधी सुरू
- 27 मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद.
- 28 मार्च – रविवार
- 29 मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.
- 30 मार्च – या दिवशी बँका सुरू
- 31 मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने कामकाज नाही.
- 1 एप्रिल – क्लोजिंग ऑफ अकाऊंट
- 2 एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी
- 3 एप्रिल – या दिवशी बँका सुरू राहतील.
- 4 एप्रिल – रविवारची सुट्टी


























































